Choose Your Language

मराठी हिंदी इंग्रजी
Marathi Hindi English
indian classical music performing vocalist, classical vocal music artist, gwalior gharana, classical concert singer
indian classical music performing vocalist, classical vocal music artist, gwalior gharana, classical concert singer
 
Photo Gallery
         
More...
 
indian classical music performing vocalist, classical vocal music artist, gwalior gharana, classical concert singer Audio - Video Clips
 
Deti Saad - Swara Naad CD
deti saad - swara naad cd
About CD
 
Media
MP3 CD - Exclusive rare compositions of some indian classical musical vocal genre ike dhrupad, ashtapadi, raas, kaiwad prabandh, trivat, pancharang, swararth prabandh, ragmaala, chatarang etc, presented in 63 bandish along with detailed narration in english, hindi and marathi
 देती साद- स्वर नाद' सी. डी. (Deti Saad - Swara Naad CD)


ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका डॉ. नीता भाभे यांच्या देती साद - स्वर नाद या विविध अनवट गानप्रकारांच्या दुर्मिळ बंदिशींच्या सीडीचे प्रकाशन पुणे आकाशवाणी केंद्राचे केंद्राधिकारी श्री. पतंजली मादुस्कर यांच्या हस्ते नुकतेच झाले.

 

पूर्वी मैफिलीत गायले जाणारे गानप्रकार आता परीक्षेपुरतेच मर्यादित राहिले आहेत, पण या सीडीच्या निमित्ताने परत हे प्रकार निश्चितच लोकांपर्यंत पोहोचतील असा विश्वास श्री. मादुस्कर यांनी व्यक्त केला.

प्रबंध म्हणजे स्वरतालबध्द चिजा. शास्त्रीय संगीतात असे अनेक प्रबंध आहेत, त्याची एकत्रित माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमधील निवेदनाद्वारे दिली आहे. या सीडीमुळे पुढे येणाऱ्या  अभ्यासकांना मदत तर होणारच आहे, पण मागे ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांनासुध्दा जे माहित नाही ते या सीडीमुळे माहित होणार आहे त्या दृष्टीने या सीडीचे महत्व फार मोठे आहे असे मत डॉ. सुनिताताई खाडिलकर यांनी व्यक्त केले.
 
भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध गायन शैलींच्या सादरीकरणातून विविध गान प्रकार श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक नामवंत, गुणी कलाकारांनी केले आहे, परंतू त्यातील काही गान प्रकार लोप पावलेले आहेत, तर काही लोप पावत आहेत. सध्याच्या मैफिलींमधून हे गान प्रकार फारसे एकायला मिळत नाहीत. स्वरार्थ प्रबंध, कैवाड प्रबंध, त्रिवट, चतरंग, पंचरंग रास, रागमाला हे गान प्रकार रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचा डॉ. नीता भाभे यांचा प्रयत्न आहे.

 

अखिल भारतीय गांधर्व महाविदयालय मंडळाच्या विशारद व अलंकार या परिक्षांना असणाऱ्या रागांमधले २० त्रिवट, चतरंग या सीडीत आहेत.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सीडीच्या निर्मात्या डॉ. नीता भाभे व त्यांच्या शिष्यांनी सीडीमध्ये असलेल्या अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग, त्रिवट, रागमाला या गानप्रकारांच्या बंदिशी सादर केल्या.

या प्रसंगी विशेष अतिथी म्हणून श्री. दाजीकाका गाडगीळ, ज्येष्ठ गायक पं. नारायणराव बोडस, तबला वादक श्री. विनायक फाटक, श्री. विजय दास्ताने, पुणे आकाशवाणी केंद्राचे माजी संगीत प्रमुख श्री. रवींद्र आपटे इ. मान्यवर उपस्थित होते.