Choose Your Language

मराठी हिंदी इंग्रजी
Marathi Hindi English
 
 
छायाचित्र विभाग
         
More...
 
ऑडिओ - व्हिडिओ क्लिप्स
 
'देती साद- स्वर नाद' सी. डी.
देती साद- स्वर नाद' सी. डी.
सी. डी. विषयी
 
माध्यम
   घराण्याविषयी :
 


भारतीय शास्त्रीय संगीत हे रागात सामावलेले आहे. ताल, लय व रागस्वरूप इ. चे नियम पाळून कलाकाराला आपल्या कल्पना मांडण्यास पूर्ण वाव असतो. एखादा प्रतिभावान कलाकार आपली राग विस्ताराची स्वत:ची खास पध्दत निर्माण करतो. हि शैली रसिकांसमोर येऊन जेव्हा रसिक मान्य पावते तेव्हा कलाकार आपल्या शिष्यांना हया शैलीची तालीम देतो. पुढे हे शिष्य आपल्या शिष्यांना शिकवतात अशा तऱ्हेने शैलीची परंपरा निर्माण होऊन मूळ शैली ज्या कलाकाराची, तो ज्या गावात, संस्थानात रहात असेल त्याचे नाव त्या शैलीला मिळते. ही शैली म्हणजेच घराणे होय. सूसुत्रता, शिस्त, काटेकोरपणा व परंपरेने जतन केलेली गायकी म्हणजे घराणे.ग्वाल्हेर घराणे :

हे हिंदुस्थानी ख्याल गायकीचे आद्यपीठ समजतात. या घराण्याची निर्मिती घृपद गायनातून तसेच सुफीसंत व कव्वालबच्च्यांच्या गायनातून झाली असे मानतात तर काही मतानुसार ग्वाल्हेर नरेश जयाजीराव महाराज यांनी आश्रय दिलेल्या नत्थन पीरबक्ष यांच्या पासून सुरू झालेल्या परंपरेला ग्वाल्हेर घराणे म्हणतात.
 

पहिल्या आलापात राग स्पष्ट होणे याला या घराण्यात महत्व आहे. ख्यालगायन हे सूर, ताल व बंदिशीशी निगडीत त्यामुळे ग्वाल्हेर घराण्यात बंदिशींना महत्व दिले जाते. एकाच रागात वेगवेगळया प्रकारच्या, वेगवेगळया आवाजांना पेलू शकणाऱ्या बंदिशी आहेत. रंजकतेसाठी बंदिशींनुसार विस्तार केला जातो. बंदिशीमधील सम व काल यांच्या जागांची ठेवण विशिष्ट अक्षरांवर असते. बंदिश मांडण्याची विशिष्ट पध्दत आहे. स्थायी दोन वेळा, अंतरा एक वेळ म्हणून संपूर्ण बंदिश आधी मांडली जाते व नंतर विस्तार केला जातो.
 

घृपद - धमाराचे गांभीर्य या गायकीत आहे. वेगवेगळया पटी - दुगुन तिगुन चौगुन, आडलय, वेगवेगळया तिहाया, समेवर झेप घेणे तसेच सहज, खुले, जोरदार व मोकळया आवाजातील गायन हे घृपद अंग मोठया प्रमाणात आढळते. विलंबित बंदिशीही अनेक ओळींचे
स्थायी - अंतरे असलेल्या धृपदांसारख्या आढळतात. अनेक ढंगी भारदस्त, रसभरित स्थायी अंतरे आहेत.

तालाची लय - मध्यलयीत गातात. तिलवाडा, झुमरा हे प्रमुख ताल. पूर्वी एकताल क्वचित गायला जायचा. तालाच्या खंडांचे वजन, आकृतीबंध पुढे ठेवून गाणे म्हणजे ग्वाल्हेर गायकी. तालाचा डौल या गायकीत लक्षात येतो प्रचलित, शुध्द राग गाण्याकडे जास्त भर दिला जातो. रागातील विश्रांती स्थाने, बलस्थाने याला महत्व दिले जाते. ताना आरोही अवरोही, सरळ, सपाट, पल्लेदार असतात. बेहेलाव्यांचा जास्त वापर केला जातो.
 

ग्वाल्हेर गायकी एका विशिष्ट पैलूलाच प्राधान्य देत नाही. सर्व अंगांचा समतोल आढळतो. ही अष्टांगप्रधान गायकी आहे. गमक, आंदोलन, कंप, मींड, मुर्की, पटक, खटक, जमजमा या आठ अंगांचा योग्य ठिकाणी उपयोग करून घेतलेली गायकी आहे. प्रासादयुक्त तरीही सरळ, साधी, समजण्यास सोपी आहे. पाचपेच नाहीत, स्वरतालाची सूक्ष्म कामगत नाही तरीही स्वरलयीचा उत्तम मेळ साधल्यामुळे श्रोते या गायकीचा सहज श्रवणानंद घेतात.

तैयारी वर विशेष भर त्यामुळे तराणे, त्रिवट, चतरंग, टप्पा हे प्रकार प्रसिध्द आहेत.
 आग्रा घराणे :

आग्रा घराण्याचे घग्गे खुदाबक्ष यांना ग्वाल्हेर घराण्याचे नत्थन पीरबक्ष यांची तालीम मिळाली त्यामुळे आग्रा व ग्वाल्हेर यांच्या पेशकारीत खूप साम्य आढळते. नोमतोमचे आलाप व लयकारी यांना आग्रा घराण्यात प्राधान्य आहे. खुला, जोरदार आवाज, धृपद अंगाचे नोमतोम आलापांनी सुरवातीचा राग विस्तार हे वैशिष्ट्य आहे. बोलअंग जास्त आढळते. तालावर प्रभुत्व, वेगवेगळया उठावाच्या द्रुत लयीतील बंदिशी. लयांग जास्त. झुमरा, आडाचौताल, झपताल इ. तालांमध्ये गायन. मंद्रसप्तकात जास्त वेळ स्वर लावले जातात. जबडयाच्या ताना, आक्रमक बोलताना आढळतात. प्रचलित तसेच अप्रचलित रागही गायले जातात.
 


मिया तानसेन

सदारंग
(पुत्री वंशातील)

 
 

मख्खनखाँ
(सदारंगांचा भाचा)

 

नत्थन पीरबक्ष (मख्खनखाँचे पुत्र)

 

ग्वाल्हेर
 
 
 

हद्दुखाँ, हस्सुखाँ (पीरबक्ष यांचे नातु)

 
 
 

गायनाचार्यं कै. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर

 
 
 
 
कै. पं. वि. दि. पलुस्कर

कै. पं. गुंडोबुवा इंगळे

     

कै. पं. केशवबुवा इंगळे

     

डॉ. ना. वा. दिवाण

 

डॉ. नीता भाभे

आग्रा
 
घग्गेखुदाबक्ष
 
 
गुलाम अब्बास
 
 
उ. फैयाजखाँ साहेब
 
 
कै. पं. श्रीपत शास्त्री
 
 
श्री. अनंत भाभे
 
डॉ. नीता भाभे