|
निर्मिती :
|
|
भारतीय शास्त्रीय संगीताच्या
विविध गायन शैलींच्या सादरीकरणातून विविध गान
प्रकार श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक
नामवंत, गुणी कलाकारांनी केले आहे, परंतू त्यातील
काही गान प्रकार लोप पावलेले आहेत, तर काही लोप
पावत आहेत. सध्याच्या मैफिलींमधून हे गान प्रकार
फारसे ऐकायला मिळत नाहीत. अष्टपदी, तराणे या
बरोबरच त्रिवट, चतरंग पंचरंग रास, कैवाड प्रबंध,
रागमाला हे गान प्रकार 'रागरंग` या
कार्यक्रमाद्वारे रसिक श्रोत्यांपर्यंत
पोहोचवण्याचा डॉ. नीता भाभे यांचा उपक्रम आहे.
|
कार्यक्रमात या प्रकारांचे
निवेदनाद्वारे स्पष्टीकरणासहीत सादरीकरण केले जाते,
जेणे करून हे प्रकार श्रोत्यांना समजुन त्यांना
त्याचा जास्त चांगल्याप्रकारे श्रवणानंद घेण्यात
यावा.
|
डॉ.नीता भाभे या स्वरचनाकारही
आहेत. त्यांनी अनेक रागात तराणे बांधले आहेत.
त्यांनी आपल्या रागरंग या कार्यक्रमासाठी दुर्गा,
बहार, जोग या रागात चतरंग बांधले आहेत,जे अनुक्रमे
रुपक,आडाचौताल व द्रुतएकतालात आहेत. तसेच विभास, मेघमल्हार, हंसध्वनी या रागात त्रिवट बांधले आहेत, जे अनुक्रमे झपताल, त्रिताल, एकताल या तालात आहेत. |
|
|