Choose Your Language

मराठी हिंदी इंग्रजी
Marathi Hindi English
 
 
छायाचित्र विभाग
         
More...
 
ऑडिओ - व्हिडिओ क्लिप्स
 
'देती साद- स्वर नाद' सी. डी.
देती साद- स्वर नाद' सी. डी.
सी. डी. विषयी
 
माध्यम
 



काही निवडक कला प्रस्तुती :
 




एकल :

१.

सरस्वती संगीत विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव व गुरू डॉ. ना. वा. दिवाण यांच्या अमृत महोत्सवानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शास्त्रीय गायन सादर.

२.

गोपाल गायन समाज पुणे यांनी आयोजित केलेल्या संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

३.

अभिज्ञान मंडळ पुणे यांचे वतीने आयोजित केलेल्या संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

४.

चिंचवड येथील अनाहत संगीत अकादमी - नादब्रहम परिवार - दत्तसेवा मंडळ आयोजित पौर्णिमा संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

५.

गांधर्व महाविद्यालय पुणे आयोजित कै. सरदार पुरंदरे स्मृतीसभेत शास्त्रीय गायन सादर.

६.

चिंचवड येथील चिंचवड देवस्थान ट्रस्ट (मोरया गोसावी गणेश मंदिर) आयोजित चतुर्थी संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

७.

पालघर (ता. वसई, जि. ठाणे) येथील संगीतज्ञ कै. श्री. बेंद्रेबुवा यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

८.

मिरज येथील श्री अंबाबाई नवरात्र महोत्सवात शास्त्रीय गायन सादर.

९.

अंबड येथील गायनाचार्य कै. पं. गोविंदराव जळगांवकर स्मृती - दत्तजयंती महोत्सवात शास्त्रीय गायन सादर.

१०.

रत्नागिरी येथील `खल्वायन` संस्थेच्या संगीत सभेत शास्त्रीय गायन सादर.

   
 

अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक संघाच्या श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे भरलेल्या पहिल्या अघिवेशनात कै. श्री.गजाननराव वाटवे यांच्या मुलाखती नंतर डॉ.नीता भाभे यांना सुगम संगीत सादर करण्याचा मान मिळाला. या कार्यक्रमात कै.श्री.गजाननराव वाटवे यांनी चाल दिलेली काही गीते डॉ.नीता भाभे यांनी सादर केली होती.

   
 

याशिवाय इतर अनेक ठिकाणी शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम व नाटयगीत गायन सादर.



समुह :

कै. य. सि. उर्फ नानासाहेब आपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दि. २२ मार्च २००९ रोजी भरत नाटय मंदिर पुणे येथे `रागरंग` हा त्रिवट, चतरंग, पंचरंग, रास, कैवाड प्रबंध, रागमाला या गान प्रकारांचा विशेष कार्यक्रम डॉ. नीता भाभे व त्यांच्या शिष्या तसेच मैत्रिणी यांनी सादर केला. याची संपूर्ण संकल्पना डॉ. नीता भाभे यांची होती.

हाच कार्यक्रम अभिज्ञान मंडळातर्फे २६ जुलै २००९ रोजी भारत गायन समाज, पुणे येथे सादर केला गेला.

रसिकांच्या आग्रहास्तव या कार्यक्रमाचा तिसरा प्रयोग २७ फेब्रुवारी २०१० रोजी वेदशास्त्रोत्तेजक सभागृह पुणे येथे सादर झाला.