Choose Your Language

मराठी हिंदी इंग्रजी
Marathi Hindi English
 
 
छायाचित्र विभाग
         
More...
 
ऑडिओ - व्हिडिओ क्लिप्स
 
'देती साद- स्वर नाद' सी. डी.
देती साद- स्वर नाद' सी. डी.
सी. डी. विषयी
 
माध्यम
   


कलाकाराविषयी :
 

ग्वाल्हेर व आग्रा घराण्याच्या गायिका डॉ. नीता अनंत भाभे यांना संगीत कलेचा वारसा वडिलांकडून व आजोळकडून मिळाला. त्यांचे वडिल श्री. अनंत भाभे यांचे सुरवातीचे शिक्षण किराणा घराण्याचे कै. बाबुराव साळवेकर यांचेकडे झाले. यानंतर श्री अनंत भाभे यांनी धुळे येथील कै. श्रीपत शास्री यांचेकडे आग्रा घराण्याची तालीम घेतली. गायना बरोबरच तबला व हार्मोनिअम शिकलेले, त्यांच्याकडून डॉ. नीता भाभे यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
 
सर्व कुटुंबीय संगीत कलेत रमले आहे डॉ. नीता भाभे यांच्या आईला गाण्याची उत्तम जाण असुन त्या सुगम संगीत गातात. डॉ. नीता भाभे यांचे बंघु श्री अजित भाभे हेही कलाकार असुन तबला साथ करतात.
 
पुण्यातील `ललकार` या सुप्रसिध्द ध्वनीक्षेपक संस्थेचे संस्थापक व संचालक कै. य. सि. उर्फ नानासाहेब आपटे हे, डॉ. नीता भाभे यांचे आजोबा. पुण्यातील कै. सुधीर फडके यांचे गीतरामायण तसेच सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या बहुतेक सर्व मोठया संगीत महोत्सवांचे ध्वनीक्षेपणाचे काम त्यांचेकडे होते, त्यामुळे डॉ. नीता भाभे यांच्यावर चांगल्या संगीताचे संस्कार झाले. आजोबांनी गाण्याची आवड निर्माण केली व या आवडीला आजी, आई, वडील यांनी सक्रीय खतपाणी घातले.
 
बालपणी सौ. विद्याताई पेंढरकर यांच्या मार्गदर्शनाखाली गाण्याच थोड-फार शिक्षण घेऊन त्यांच्या संस्थेच्या अनेक कार्यक्रमात डॉ. नीता भाभे यांनी सहभाग घेतला. नंतर ग्वाल्हेर घराण्याचे कै. पं. मधुसूदन पटवर्धन यांच्या शिष्या सौ.लताताई कानडे यांचेकडे डॉ. नीता भाभे यांचे शास्त्रीय संगीताचे प्राथमिक शिक्षण झाले.
 
त्यानंतर गुरू संगीताचार्य कै. डॉ. ना. वा. दिवाण यांच्या सरस्वती संगीत विद्यालय या पुण्यातील पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या संस्थेतून सौ. सुरभि जोशी, श्रीमती मनिषा पाटणकर व सौ. समिता बापट यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नीता भाभे यांचे `संगीत विशारद` पर्यंतचे शिक्षण झाले.

शास्रीय गायना बरोबरच त्यांनी काही काळ भावगीत गायक कै. श्री. गजाननराव वाटवे यांचेकडून सुगम संगीताचेही मार्गदर्शन घेतले.

गुरु कै. डॉ. ना. वा. दिवाण यांचेकडून डॉ. नीता भाभे यांना ग्वाल्हेर गायकीची तालीम मिळाली तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची `संगीत अलंकार` ही पदवी मिळाली.
 
त्यानंतर गुरू संगीताचार्य कै. डॉ. ना. वा. दिवाण व डॉ. सौ. शोभाताई गुर्जर यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची `संगीताचार्य` ही सर्वोच्च पदवी मिळवली.

सध्या त्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या अलंकार परीक्षेसाठी परीक्षक म्हणून कार्यरत आहेत, तसेच शास्त्रीय गायनाच्या मैफिली करतात. स्वत:च्या विद्यालयामार्फत प्रशिक्षण देतात.

नवोदित व उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.नीता भाभे या दरवर्षी आपल्या आजोबांच्या नावे कै.य.सि उर्फ नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार देतात.
 


शैक्षणिक पात्रता :
  • एम.ए. (इतिहास) पुणे विद्यापीठ - प्रथम श्रेणी
  • एम.ए. (इंडॉलॉजी) टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे - प्रथम श्रेणी
  • बी.एड, पुणे विद्यापीठ - प्रथम श्रेणी


सांगितीक पात्रता :
  • एम.ए. (संगीत) एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई - प्रथम श्रेणी
  • संगीत अलंकार - अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई - प्रथमश्रेणी
  • संगीताचार्य - अ.भा.गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांची सर्वोच्च पदवी



गुरू :
ग्वाल्हेर घराण्याचे कै. पं. मधुसूदन पटवर्धन यांच्या शिष्या सौ. लताताई कानडे, एक उत्तम गायिका आहेत. शास्त्रीय गायनाबरोबरच सुगम तसेच नाटय संगीत ही उत्तम गातात.

ग्वाल्हेर घराण्याचे, संगीताचार्य कै. डॉ. ना. वा. दिवाण हे कै. वामनबुवा पाध्ये (पाध्येबुवा - कोल्हापूर) व कै. पं. केशवबुवा इंगळे यांचे शिष्य होते. डॉ. ना. वा. दिवाण यांनी पं. वि. रा. आठवले यांचे संगीताचार्य परीक्षेसाठी मार्गदर्शन घेतले होते.

गुरू कै. डॉ. ना. वा. दिवाण यांची स्वत:ची सरस्वती संगीत विद्यालय (स्थापना-पुणे, १९५२) ही संस्था आहे. हे विद्यालय अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्याशी संलग्न असून मंडळाच्या परीक्षांसाठीचे मान्य परीक्षा केंद्र आहे.
गुरू कै. डॉ. ना. वा. दिवाण हे सर्व स्तरातील गायक गायिकांना त्यांच्या कुवतीप्रमाणे प्रारंभिक ते संगीताचार्य पदवीपर्यंत उत्तम प्रशिक्षण देत असत. आजपर्यंत ७५० संगीत विशारद व ३०० संगीत अलंकार झालेले आहेत.

गुरू कै. डॉ. ना. वा. दिवाण हे मैफिल सादरीकरणात ही निपुण होते. प्रचलित राग गाण्यावरच त्यांचा भर होता. गायन ग्वाल्हेरी पध्दतीप्रमाणे मध्यलयीतच होते. बोलआलाप, बोलतान तसेच विविध प्रकारच्या तानांचे उत्तम सादरीकरण करत असत. अतिद्रुतलयीचे तराणे गाण्यात हातखंडा होता.

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाचे आश्रयदाता सभासद (पेट्रन मेंबर) तसेच अनेक मान्यवर संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. पुणे विद्यापीठ, मराठवाडा विद्यापीठ, भारत गायन समाज, गांधर्व महाविद्यालय, पुणे, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ या संस्थांच्या परीक्षांकरता मान्यवर परीक्षक म्हणून ही काम करत असत.
पुण्यातील प्रसिद्ध तबला वादक श्री. विजय दास्ताने यांचेही मार्गदर्शन डॉ. नीता अनंत भाभे यांना मिळत आहे.