|
संगीताचार्य परीक्षेविषयी :
|
|
संगीताचार्य ही अखिल भारतीय
गांधर्व महाविद्यालय मंडळाची सर्वोच्च पदवी परीक्षा
आहे. ही परीक्षा दोन प्रकारे देता येते.
|
-
फक्त शोध प्रबंध लिहून.
-
प्रत्यक्ष सादरीकरण करून.
|
गायन ही सादरीकरणाची कला
असल्यामुळे डॉ. नीता भाभे यांनी प्रत्यक्ष
सादरीकरण हा परीक्षा प्रकार निवडला.
या परीक्षेकरता
शंभर गुणांचा शोध प्रबंध लिहायचा असतो. त्याचा
विषय हा सादरीकरणाशी संबंधित असावा लागतो. उर्वरित
चारशे गुणांची परीक्षा ही सादरीकरणाची असते. पैकी दोनशे गुणांची मौखिक परीक्षा असते, तर दोनशे गुण
हे मैफिलीच्या सादरीकरणासाठी असतात. १००, २००, २००
अशी एकुण पाचशे गुणांची परीक्षा असते. या परीक्षेत
उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विभागात ७०% गुण मिळणे
आवश्यक असते.
|
मंडळाच्या अभ्यासक्रमाप्रमाणे
पूर्वी - गौरी प्रकार, मारवा थाट - पंचम प्रकार,
केदार - कल्याण बिहाग प्रकार, बिलावल - नट प्रकार,
मल्हार-बहार प्रकार, सारंग - धनाश्री प्रकार, कानडा
प्रकार, भैरव प्रकार, तोडी आसावरी भैरवी प्रकार इ.
मधील ७८ रागांचे तसेच यांच्या जवळपासच्या रागांचे
त्या त्या रागातील वैशिष्ट्यपूर्ण स्वरलगाव,
आलाप-तानांची पध्दत याचे विवेचनासह सादरीकरण करावे
लागते.
|
डॉ. नीता भाभे यांनी `प्रचलित
उत्तर हिंदुस्थानी कंठसंगीतातील रागबढतीमध्ये
स्वरलगावांचे महत्व` हा विषय शोधप्रबंधासाठी निवडला
होता. स्वरलगावांशिवाय रागांची मांडणी करता येणे
शक्य नाही व ही गोष्ट गुरूमुखातून तसेच स्वत:च्या
मेहनतीतून साध्य करता येऊ शकते, तरीही स्वर
लगावांचे प्रकार व ते लिहिण्यासाठी विशिष्ट चिन्हे
यावर त्यांनी संशोधन केले. त्यांना त्यांचे गुरू
डॉ. ना. वा. दिवाण व डॉ. सौ. शोभाताई गुर्जर यांचे
मार्गदर्शन लाभले. |